85% अनुदानावर तार कुंपण अर्ज कुंपण | Tar kumpan scheme 2026
वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी अनुसूचित जमातीच्या व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन Tar kumpan scheme 2026 केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (न्युक्लिअस बजेट योजना) सन 2025-26 अंतर्गत अ गट उत्पन्न निर्मितीच्या योजना क गट मानव साधन संपत्ती विकासाच्या व कल्याणात्मक योजनाचे अर्ज लाभार्थी लॉगीन मधून ऑनलाईन पध्दतीने https://nbtribal.in या संकेतस्थळावरुन मागविण्यात आले होते. तरी आता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी 30 January 2026 पर्यत मुदतवाढ दिली आहे. या योजनेंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.nbtribal.in ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या कालावधीमध्ये अर्ज सादर न करू शकलेल्या लाभार्थ्यांच्या सोयीसाठी दि. २१ ते दि. ३० जानेवारी २०२६ या कालावधीत अर्ज सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे...