पोस्ट्स

Solar Yojana लेबलसह पोस्ट दाखवत आहे

छतावरील सोलर च्या अनुदानासाठी नवी अर्ज प्रक्रिया | New to simplified procedure install rooftop solar plant

इमेज
ऊर्जा मंत्रालयाने निवासी ग्राहकांसाठी छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र स्थापित करण्यासाठी सोपी प्रक्रिया केली जारी  New to simplified procedure install rooftop solar plant संकेतस्थळे /सोशल मीडियावर प्रकाशित होत असलेल्या दिशाभूल करणाऱ्या फसव्या माहितीपासून दूर राहण्याचा  सामान्य जनतेला सल्ला Ministry of New and Renewable Energy issues simplified procedure   to  install rooftop solar plant for the residential consumers नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालया मार्फत  निवासी ग्राहकांसाठी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती सयंत्र (  rooftop solar plant  )  लावण्यासाठी अनुदान दिले जाते.  या योजने अंतर्गत लाभार्थी स्वतःहून  किंवा त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही विक्रेत्याद्वारे छतावर  सौर ऊर्जा निर्मिती  संयंत्र स्थापित करू शकतो.  आणि याच योजनेसाठी ची  सोपी  प्रक्रिया ऊर्जा मंत्रालयाने  जारी केली आहे. नवीन प्रक्रियेतील काही मार्गदर्शक सूचना  खालील प्रमाणे आहेत: लाभार्थ्यांकडून अर्जांची नोंदणी ,...

शेतकऱ्यांना “सौर ऊर्जा कुंपण”उभारण्यासाठी अनुदान | Jan van yojana 2022

इमेज
 शे तकऱ्यांना “सौर ऊर्जा कुंपण”उभारण्यासाठी अनुदान वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील संवेदनशील गावांमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविली जाते. याच योजनेची व्याप्ती वाढवून त्यामध्ये सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे  वनक्षेत्राचे प्रभावी संरक्षणामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत अलीकडे लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर मानव-वन्यजीव संघर्ष वाढून विशेषत: शेतपीक नुकसानीच्या घटना घडू लागल्या आहेत. वन्यजीवांमुळे शेतपिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना पिकाचे रक्षणाकरिता रात्रीच्या वेळी शेतावर पिकाचे संरक्षण करावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय तर होतेच पण वन्यजीवांच्या हल्ल्याचा धोकादेखील असतो. त्यावर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत प्रायोगिक तत्वावर वैयक्तिक सौर ऊर्जा कुंपण उभारण्याची योजना राबविण्यात आली. यातून या भागात गेल्या काही वर्षात पिक नुकसानीचे प्रकार कमी झाल्याचे दिसून आले. तसेच सौर ऊर्जा कुंपण हटवता येण्यासारखे असल्याने वन्यप्राण्यांचे भ्...

घरगुती वीजग्राहकांसाठी रुफटॉप सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी ४० टक्के अनुदान | Roof top solar anudan 2022

इमेज
  महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांसाठी रुफटॉप सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी ४० टक्के अनुदान,  गृहनिर्माण संस्था, निवासी संघटनांना २० टक्के अनुदान, वीजबिलात मोठी बचत, सुमारे ४ वर्षांत परतफेडीची संधी, नेटमिटरिंगद्वारे ग्राहकांची वीज महावितरण विकत घेणार Roof top solar anudan 2021 Roof top solar anudan 2022 महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील ( Roof top solar anudan 2021 ) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होणार आहे तर नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाणार आहे.   केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रुफटॉप सौर योजना टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी २५ मेगावॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शा...

छतावरील सोलर साठी अर्ज सुरू, मिळणार ४०% अनुदान || roof top solar online application

इमेज
ग्रीडशी संलग्न असलेल्या छतावरच्या सौर प्रणालीला केंद्र सरकारचे प्रोत्साहन ग्रामीण भागासह देशात छतावरच्या सौर प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी नविकरणीय उर्जा मंत्रालय छतावर सौर कार्यक्रमाचा II टप्पा राबवत आहे. Video पहा अर्ज कसा करायचा  या अंतर्गत 2022 पर्यंत निवासी भागात, अनुदानाच्या तरतुदीसह 4000 मेगावॅट स्थापनेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वैयक्तिक कुटुंबासाठी 3 किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या छतावरच्या सौर प्रणालीसाठी प्रमाण खर्चाच्या 40% अनुदान तर 3 च्या पुढे  10 किलोवॅट पर्यंत क्षमतेच्या छतावरच्या सौर प्रणालीसाठी प्रमाण खर्चाच्या 20% अनुदान पुरवण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय उर्जा आणि नविकरणीय उर्जा मंत्री आर के सिंह यांनी काल राज्य सभेत लेखी उत्तरात दिली. गट गृहनिर्माण संस्था/निवासी कल्याण संघटना (जीएचएस/ आरडब्ल्यूए) साठी, सामायिक सुविधांसाठी उर्जा पुरवण्याकरिता 500 किलोवॅटपर्यंत क्षमतेच्या छतावरच्या सौर प्रणालीसाठी प्रमाण खर्चाच्या 20% अनुदान आहे. देशात ग्रीडशी संलग्न असलेल्या छतावरच्या सौर प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने केलेल...