पोस्ट्स

Gaothanlandna लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आता गावठाण लगतच्या जमिनी NA करण्याची गरज नाही | Gaothan land NA

इमेज
आता गावठाण लगतच्या जमिनी NA करण्याची गरज नाही. Gaothan land NA  राज्यातील शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचा संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असे परिपत्रक 13 एप्रिल 2022 रोजी काढण्यात आलेले आहे, राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. गावठाण हद्दी पासून दोनशे मीटरच्या आतील ज्या जमिनी आहेत आशा जमीन मालकांना बिनशेती परवानगी (NA) घेण्याची आवश्यकता असणार नाही. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 42 ब क आणि ड हे कलम समाविष्ट केल्यानंतर NA करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि याच बदलाच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक राज्याचे महसूल विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांच्या माध्यमातून काढून या सूचना सर्व तहसील कार्यालयांना देण्यात आलेले आहेत.  त्याच्यामुळे गावठाण हद्दीपासून दोनशे मीटरच्या परिगय क्षेत्रांमध्ये रहिवासी वाणिज्यिक आणि औद्योगिक अशा प्रकारच्या वापरासाठी ज्या जमिनी शेती स्वरूपाच्या वापर करण्यासाठी जमिनी आहेत या जमिनीचे गटनंबर सर्वे नंबर दर्शवणारे याद्या तयार करून या याद्या मधील जमिनी, गट वर्ग एक आहे की वर्ग २ आहे असे वर्गीकरण करावे. ...