मुलींना सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्य अर्ज सुरू | Cycle anudan yojana 2023
मुलींना सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्य अर्ज सुरू Cycle anudan yojana 2023 जिल्हा परिषदेच्या सेस योजना सन 2023-24 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय शालेय मुलामुलींना सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरविणे ही योजना घेण्यात येत आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्जदारांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत जे विद्यार्थी हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी आहेत व इयत्ता पाचवी ते नववीमध्ये शिक्षण घेत आहेत, असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील. त्याचप्रमाणे विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेचे अंतर त्यांच्या घरापासून किमान दोन कि.मी. असावे. ही योजना डीबीटी तत्वावर राबवावयाची असल्याने निवड केलेल्या लाभार्थीने सर्वप्रथम सायकल खरेदी करुन अनुदानासाठी मूळ देयक व सायकल खरेदी केल्याबाबतचे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्रासह प्रस्ताव समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांना सादर करावयाचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर सायकलच्या किंमती इतकी अथवा जास्तीत जास्त 5 हजार रुपये वर्ग करण्यात येईल. ...