Recent Post

Popular Posts

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हप्ता वितरणाचा मार्ग मोकळा || Namo Shetkari Mahasanman nidhi yojana

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हप्ता वितरणाचा मार्ग मोकळा

Namo shetkari Mahasanman nidhi yojana 

राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राबवली जाणारी महत्वाची योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना.

मात्र गेल्या ५ ते ६ महिन्यापासून योजनेअंतर्गत अनुदानाच वितरण न करण्यात आल्याने या योजनेबद्दल संभ्रम निर्माण झालेले होते. ही योजना शासनाने गुंडाळली असाही आरोप करण्यात आला.

मात्र कृषिमंत्री यांच्यामध्यमातून या योजनेचा हप्ता लवकरच वितरीत केला जाणार असल्याची माहिती दिली व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

२०२६ च्या अर्थसंकल्पात योजनेसाठी काय तरतूद केली जातेय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र अर्थसंकल्प सादर करत असताना या योजनेचा उल्लेख न झाल्याने पुन्हा संभ्रम निर्माण झाले.

मात्र या योजनेकरीता प्रवर्ग निहाय निधी उपलब्धता करण्यात आली आहे.

GR 09.02.2026

मो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच्या नवीन लेखाशिर्षास मान्यता

नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या नवीन लेखाशिर्षास मान्यता



नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरीता बजेट मध्ये निधीची तरतूद.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जमाती शेतकऱ्याकरिता ६९६ कोटी रुपयांची तर आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमाती करिता ५७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

लवकरच या योजनेच्या हप्ता वितरणासंदर्भात निर्णय घेतला जाईल.