तेलबिया, डाळी आणि भरड धान्यांसाठी किमान आधारभूत किंमत जाहिर !
rabbi msp declared
विपणन हंगाम 2024-25 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) केंद्रीय मंत्रिमंडळाने केली वाढ

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) 2024-25 साठी सर्व रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली आहे.
शेती उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी रास्त भाव मिळावा यासाठी सरकारने विपणन हंगाम 2024-25 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ केली आहे.मसूरच्या एमएसपीमध्ये 425 रुपये प्रति क्विंटल तर पांढरी मोहरी आणि काळ्या मोहरी साठी 200 रुपये प्रति क्विंटल दराने वाढ मंजूर करण्यात आली आहे. गहू आणि करडईसाठी प्रत्येकी 150 रुपये प्रतिक्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे. बार्ली आणि हरभऱ्यासाठी अनुक्रमे 115 रुपये प्रति क्विंटल आणि 105 रुपये प्रति क्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे.
विविध प्रकारची पिके घेण्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने, विविध पिकांसाठी वेगवेगळी किमान आधारभूत किंमत देण्याचा उद्देश आहे.
विपणन हंगाम 2024-25 साठी सर्व रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (रु. क्विंटलमध्ये)
S.No | Crops | MSP RMS 2014-15 | MSP RMS 2023-24 | MSP RMS 2024-25 | Cost* of production RMS 2024-25 | Increase in MSP (Absolute) | Margin over cost (in per cent) |
1 | Wheat | 1400 | 2125 | 2275 | 1128 | 150 | 102 |
2 | Barley | 1100 | 1735 | 1850 | 1158 | 115 | 60 |
3 | Gram | 3100 | 5335 | 5440 | 3400 | 105 | 60 |
4 | Lentil (Masur) | 2950 | 6000 | 6425 | 3405 | 425 | 89 |
5 | Rapeseed & Mustard | 3050 | 5450 | 5650 | 2855 | 200 | 98 |
6 | Safflower | 3000 | 5650 | 5800 | 3807 | 150 | 52 |
* सर्वसमावेशक खर्चाचा संदर्भ देत, मजुरांची मजुरी , बैल किंवा यंत्राद्वारे केलेल्या आणि अन्य कामांची मजुरी , भाडेतत्वार घेलेल्या जमिनीचे भाडे, बियाणे, खते, सेंद्रिय खते, सिंचन शुल्क यासारख्या भौतिक साहित्याच्या वापरावर झालेला खर्च,अवजारे आणि शेत बांधणीवरील घसारा, खेळत्या भांडवलावर व्याज, पंप संच इत्यादींसाठी डिझेल/वीज इ., विविध खर्च आणि कौटुंबिक श्रमांचे मूल्य याचा सर्व देय खर्चामध्ये समावेश आहे.
शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर मोबदला मिळावा या उद्देशाने, किमान आधारभूत किंमतीत देशभरातील सरासरी उत्पादन खर्चाच्या दीडपट वाढ निश्चित करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 मध्ये करण्यात आली होती या घोषणेच्या अनुरूप, रब्बी विपणन हंगाम 2022-23 साठी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर अपेक्षित मोबदला गहू , रॅपसीड आणि मोहरी (प्रत्येकी 100%) त्यानंतर मसूर (79%); हरभरा (74%); जव (बार्ली) (60%); करडई (50%)या पिकांच्या बाबतीत सर्वाधिक मिळण्याचा अंदाज आहे.
मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन राखण्याच्या दृष्टीने, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पिके घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसेच सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि शेती पद्धतींचा अवलंब करण्याच्या दृष्टीने तेलबिया, डाळी आणि भरड धान्यांसाठी किमान आधारभूत किंमतीची पुनर्रचना करण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये एकत्रित प्रयत्न करण्यात आले.