प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, अर्ज सुरु | PRADHAN MANTRI FORMALISATION OF MICRO FOOD PROCESSING ENTERPRISE SCHEME (PMFME)

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, अर्ज सुरु  

 PRADHAN MANTRI FORMALISATION OF MICRO FOOD PROCESSING ENTERPRISE SCHEME (PMFME)

PMFME
PMFME

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाकरिता केंद्र सरकारमार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ( PRADHAN MANTRI FORMALISATION OF MICRO FOOD PROCESSING ENTERPRISE SCHEME ) राबविण्यात येत आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ( PMFME ) अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यासाठी एक जिल्हा एक उत्पादनात ‘मका’ आधारित उत्पादने याचा समावेश करण्यात आला आहे.

 बचतगट, शेतकरी माहिला शेतकरी यांनी या योजनेत सहभाग घेऊन स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहान आर्थिक मदत दिली जाणार आहे. 
योजनेत सहभाग शेतकऱ्यांनी नोंदवून आर्थिक विकास साध्य करावा. असे अवाहन प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ह्या केंद्र शासनाच्या योजनेच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ( PRADHAN MANTRI FORMALISATION OF MICRO FOOD PROCESSING ENTERPRISE SCHEME ) ह्या केंद्र शासनाच्या योजनेच्या आढावा बैठकीला तुकाराम मोटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीता पाटील, नार्बाडचे प्रतिनिधी सुरेश पटवेकर, श्री. कास्तरकर, उद्योग निरीक्षक, जिल्हा उद्योग केंद्राचे एस.आर. वाघले, जिल्हा महिला बाल अधिकारी श्री.एम.डोंगरे, महिला आर्थिक विकास महामंडाळाचे श्री.उमेश कहाते,महाराष्ट्र ग्रामीण जीवनज्योती अभियान (उमेद) जिल्हा व्यवस्थापक विक्रम सरगट,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या श्रीमती सूचिता कोटकर आदी उपस्थित होते.

 केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME) ही केंद्र पुरसकृत योजनेतून ‘एक जिल्हा एक उत्पादन] या आधारावर राबविली जात असून औरंगाबादासाठी मका, या पीकाची निवड करण्यात आलेली आहे. 


सदर योजनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहान दिले जाणार आहे. यामधून कार्यरत असलेले सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादन गट, संस्था, कंपनी, स्वंय सहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था यांची आर्थिक मर्यादा (पतमर्यादा) वाढवण्याबरोबरच उत्पादनाचे ब्रॅन्डींग व विपणन बळकट करण्यासाठी संघटीत उत्पादन पुरवठा साखळीशी जोडण्यात येणार आहे. 
केंद्रीत सेवा साठी साठवणूक, प्रक्रिया सुविधा, पॅकेजिंग, विपणन व संस्थाचे बळकटीकरण तांत्रिक साह्य देऊन जास्तीत जास्त आर्थिक विकास शेती संलग्नीत उद्योग व उत्पादनातून शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. 

 यासाठी शेतकरी, महिला शेतकरी, बेरोजगार युवक, प्रगतशील शेतकरी, मर्यादीत भागीदार संस्था इत्यादी अर्ज करु शकतात. 
यासाठी उद्योगात 10 पेक्षा कमी कामगार असावेत, अर्जदारांचा उद्योग मालकी हक्क असावा. 
18 वय वर्षे असणारा एका कुटुंबातली एक व्यक्ती पात्र असून व प्रकल्प किमंतीचा किमान 10-40 % लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक मुदत कर्ज घेण्याची तयारी असावी. 


ऑनलाईन अर्जासाठी www.pmfme.mofpi.gov.in MIS Portal वर नोंदणी अर्ज सादर करावेत. 
अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क करावा.  
जिल्हास्तरीय सामिती मार्फत 10 लाखापर्यंतचे प्रस्ताव सादर करता येऊ शकतात. 
अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांनी दिली.


योजनेचा उद्देश

1.     सध्या कार्यरत असलेले  नवीन स्थापित होणारे ODOP उत्पादनांवर आधारीत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट/संस्था/कंपनी , स्वयं सहाय्यता गट  सहकारी उत्पादक संस्था यांची पतमर्यादा वाढविणे .

  •  उत्पादनांचे ब्रॅन्डींग  विपणन अधिक बळकट करुन त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे.
  •  महाराष्ट्रातील 21998 सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे.
  • सामाईक सेवा जसे की सामाईक प्रक्रिया सुविधासाठवणुकपॅकेजिंगविपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वंकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे.
  • अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन  प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे.
  • सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक  तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे. - मार्गदर्शन  प्रशिक्षण.
  • प्रकल्प अहवाल बनवणेऑनलाइन अर्ज करणेबँकांशी पाठपुरावा करणेविविध परवाने काढणे इत्यादिसाठी संसाधन वेक्ती कडून विनामूल्य मदत.


 समाविष्ट जिल्हे

  महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्हे (मुंबई शहर  मुंबई उपनगर सामाविष्ट)

 पात्र लाभार्थी

)    वैयक्तिक लाभार्थी - वैयक्तिक लाभार्थी,भागीदारी संस्था,बेरोजगार युवकमहिला,प्रगतशील शेतकरीमर्यादित भागिदारी संस्था (LLP), भागिदारी संस्था .  

1.     उद्योगामध्ये १० पेक्षा कमी कामगार कार्यरत असावेत.

2.     अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार (प्रोपायटरी/भागीदारीअसावा.

3.     अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे  शिक्षण किमान आठवी पास असावेएका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल.

4.     सदर उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करुन देण्याची तयारी असावी.

5.     पात्र प्रकल्प किंमतीच्या किमान 10-40% लाभार्थी हिस्सा देण्याची  उर्वरित बॅंक मुदत कर्ज घेण्याची तयारी असावी.

 

 गट लाभार्थी - शेतकरीगटकंपनी/संस्थास्वयंसहाय्यता गट,उत्पादक सहकारी संस्था .

1.“एक जिल्हा एक उत्पादन” (ODOP) धोरणानुसार निवडलेल्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत शेतकरी उत्पादक गट/कंपनी/संस्था/स्वयं सहायता गट/उत्पादक सहकारी संस्था यांना नवीन उद्योगाना प्राधान्य दिले जाईल

2. कंपनीची उलाढाल ही किमान रु. कोटी असावी.

3. कंपनीच्या सध्याच्या आर्थिक उलाढालीपेक्षा अधिक किंमतीचा प्रस्ताव असू नये

4. कंपनीच्या सभासदांना हाताळल्या जाणाऱ्या उत्पादनाबाबत पुरेशे ज्ञान  अनुभव असावातसेच सदर उत्पादनाच्या बाबतीतील किमान  वर्षांचा अनुभव असावा.

5. प्रकल्प किंमत  खेळत्या भांडवलासाठी 10-40% स्वनिधी भरण्यासाठीची तरतूद शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये असावी किंवा सदर रक्कमची राज्य शासनाची हमी असावी.

मार्केटिंग  ब्रँडिंग:- पात्र प्रकल्पाच्या 50% अनुदान

सामान्य पायाभूत सुविधा:- पात्र  प्रकल्पाच्या 35%अनुदान


पात्र प्रकल्प

नाशवंत शेतीमाल जसे फळे  भाजीपालातृणधान्येकडधान्येतेलबियामत्स्योत्पादनमसाला पिकेदुग्ध  पशुउत्पादन,किरकोळ वनउत्पादने मध्ये  सद्यस्थितीत कार्यरत- ODOP/ Non ODOP उत्पादनांमध्ये कार्यरत सुक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे स्तरवृद्धी/विस्तारीकरणआधुनिकीकरण या लाभासाठी पात्र असतीलनविन स्थापित होणारे सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग केवळ ODOP पिकांमध्ये असावेत

 या योजनेंतर्गत सामाईक पायाभूत सुविधा या घटकांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी / शेतकरी उत्पादक संघ / सहाकरी उद्योजक संघ/ सहकारी उत्पादक संस्था / शासन यंत्रणा/ खासगी उद्योग आदी घटकांना लाभ देण्यासाठी सामाईक पायाभूत सुविधा जसे शेती उत्पादनाचे वर्गीकरण, ग्रेडिंग, कोठार आणि कोल्ड स्टोरज, केळी पिकाच्या प्रक्रियेसाठी सामान्य प्रक्रिया सुविधा इत्यादिसाठी या घटकांतर्गत प्रस्ताव सादर करावयाचे आहे. सदर घटकाच्या कर्जाशी निगडित 35 टक्के अनुदान देय राहील.

एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) उत्पादने

 आर्थिक  मापदंड

1.     वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बॅंक कर्जाशी निगडीत एकुण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% जास्तीत जास्त रु. 10.00 लाखाच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहेत्याकरिता  www.pmfme.mofpi.gov.in  या संकेतस्थळावरील PMFME MIS PORTAL वर Online अर्ज सादर केले जातात.

2.      शेतकरी गटशेतकरी उत्पादक संस्था /कंपनीस्वयं सहाय्यता गट / उत्पादक सहकारी संस्था यांना सामान्य पायाभुत सुविधा  भांडवली गुंतवणुकीकरिता करिता बॅंक कर्जाशी निगडीत एकुण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान देय आहेयाकरिता कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहीत करण्यात येईल.या घटकासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात ऑनलाईनऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर केले जातील.

3.     सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत स्वयं सहाय्यता गटातील सदस्यांना खेळते भांडवल  छोटी मशिनरी घेण्याकरिता प्रती सदस्य रु. 40,000/- बीज   भांडवल रक्कम देण्यात येणार आहेस्वयं सहाय्यता गटातील सदस्यांना द्यावयाचे लाभ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोन्नती अभियान (MSRLM) यांचेमार्फत राबविले जातातत्यासाठी www.nrlm.gov.in  या संकेतस्थळावरील NRLM PORTAL वर Online अर्ज सादर केले जाताततसेच स्वयंसहाय्यता गटाच्या वैयक्तिक सदस्यास भांडवली गुंतवणूकीकरीता पात्र प्रकल्प किंमतीच्या 35%  कमाल रु.10 लाखाच्या मर्यादेत बँक कर्जाशी निगडीत अनुदान दिले जाईल.

 

🐟 सागरी उत्पादने - 

मत्स्य    मासे लोणचेसुकवलेले मासेडबाबंद मासेखारवलेले मासेगोठवलेले मासेचिप्सवेफर्सपापडफिश Popcorn, नगेट्सटिक्कीसमोसापकोडा,  इत्यादी.

 🧇 नाचणी - 

पीठपापडबिस्कीटे,  कुकीसनाचणी सत्व,चकलीइडलीशंकरपाळी,इत्यादी.

 भगर 

पीठ,भगर,इत्यादी.

🥚 चिकू-

स्कॅशपल्पजामजेलीनेक्टरस्लाईसेसआईसक्रिमकॅंडीपावडरज्यूस,चॉकलेट,चॉकलेटबार,

फ्रुटबार,वडीड्रायफ्रूट बर्फी फ्लेक्सइत्यादी.

🥭 आंबा-

पल्पजामजेलीमुरंबास्कॅशनेक्टरकोकटेलस्लाईसेसआईसक्रिमड्राइड  स्लाईसेसडबाबंदज्यूसगोठवलेलेलोणचेचटणी,फ्रुटबारलशसॉसकुंदा,सॉफ्टकँडी,अल्कोहल विरहित पेय,इत्यादी.

🍌 केळी

चिप्सप्यूरीपल्पवाईनपावडरवेफर्स, Concentrate, Figs,  Flour,  फ्रोझन स्लायसेस  डायसेसजाम,फ्रुटी,बारसुकेली टॉफीड्रायफ्रूट पिल कँडी,इत्यादी

🧅 *कांदा* -फ्राईड कांदा,  Dehydrated Onion Flakes, पेस्टपावडर, Strips , ऑईलसॉसलोणचे इत्यादी.

🍅 *टोमॅटो* -केचअपजामप्यूरीसॉसकॅन  टोमॅटोपेस्टटोमॅटो चटणी, RTE ,सूप,ज्यूसलोणचे,इत्यादी.

🥛🍦 दुग्ध  दुग्धजन्य -

बासुंदीपनीर,लोणीचीझआईसक्रिमतूपलस्सीश्रीखंडताकपेयेविप क्रिमफॅट मिल्कदहीदूध पावडरव्हे प्रोटीनखवा,मावा,छन्नासंदेश,पेढाकलाकंद,कुल्फीरबडी,बर्फीचक्काश्रीखंड वडीरसमलाईरसगुल्ला,इत्यादी.

🌽 ज्वारी  - Flakes, पिठपापडमाल्टकुकीजस्टार्चइत्यादी.

🌾 *गहू*-  Flakes, पिठब्रेडमाल्टबिस्कीटकुकीजस्टार्चइत्यादी.

🎋 *गुळ*- गुळ पावडर,  ज्यूसयीस्टमॉलॅसेसकाकवीइत्यादी.

🍇 *द्राक्षे*-        बेदाणावाईनज्यूसविनेगार, Sweet spreads, मनुकावाईन स्वॅशलोणचे,इत्यादी.

🌽 *मका*-कॉर्न सिरपपीठ,  Flakes, ऑईल,  स्टार्च,‍ Corn Stalk Fiddle, सॉसपॉपकॉर्न  इत्यादी.

🍊 मोसंबी-

ज्यूस,पल्प, RTS पेयसिरपजामजेलीनेक्टर,  सायट्रीक ॲसीड, Concentrate, Marmalade, ड्रायफ्रूट,इत्यादी.

🍈 सिताफळ-    

    पल्पजामजेलीपावडरसीड ऑईलआईसक्रिमरबडीबर्फीड्राइड स्नॅक्सज्यूसकँडी,इत्यादी

🍐 पेरू-  ज्यूसजामजेलीपल्पनेक्टरटॉफी,  RTS पेयवाईनप्यूरी,चॉकलेटचीजफ्रुटबारटॉफीज,इत्यादी.

🥗 हरभरा-बेसन पीठनमकीनफूटाणेडाळ इत्यादी.

🌿 तुर - डाळ,पीठ,इत्यादी.

🌾 मुग- पापडडाळपीठ  इत्यादी.

🥫 हळद-पावडरड्राईड रायझोम,  इत्यादी.

🌶️ मिरची-पावडरड्राईड मिरची,Flakes, लोणचे,डीहायड्रेशन,इत्यादी.

🍊 संत्रा-        ज्यूस,पल्प, RTS पेयसिरपजामजेलीनेक्टर,  सायट्रीक ॲसीड, Mandarin Concentrate,, Marmalade  तेल - mandarin essential oil, Clementine Oil , इत्यादी.

🥜 *सोयाबिन*- तेलटोफूसोयामिल्कसोयानटसोयाचन्कसोया प्रोटिनसोया सॉससोया  स्टिकसोया चिप्स,  पीठइत्यादी.

🥠 *जवस*-चटणी,  तेलइत्यादी.

🍚 *भात*-        पोहामुरमूरेपीठपापडऑईल, Parboiled Rice, Flakes, बिअरइत्यादी.

🌲🎄 *किरकोळ वन उत्पादने* -हिरडा पावडर,  महुवा-  तेल/पावडर/केक /बिस्कीटकुकीस/लोणचेइत्यादीमशरुमसुकवलेले मशरुम/बिस्कीट/कुकीस,मधडिंक,इत्यादी

 

अधिक माहितीसाठी

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी (सर्व

उपविभागीय कृषि अधिकारी (सर्व

तालुका कृषि अधिकारी (सर्व

बिज भांडवला करीता - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (सर्व )

www.pmfme.mofpi.gov.in

www.krishi.maharashtra.gov.in

 #pmfme