राज्यात कुसुम सोलर पंप योजना साठी ऑनलाईन अर्ज सुरू || Kusum pump yojana online application start

राज्यात कुसुम सोलर पंप योजना साठी ऑनलाईन अर्ज सुरू  

Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2021 Online Applicaton start on kusum mahaurja website 

केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांकडून 3 hp, 5 hp , 7.5 hp सौर कृषी पंपा साठी Solar Pump अर्ज मागविण्यात आले आहेत, यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी KUSUM MAHAURJA च्या वेबसाईटवर अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्या वतीने करण्यात आले आहे.

या योजनेत 
  • अभियान घटक“ब”
  • या अभियांनातर्गत पुढील5 वर्षात 5 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास व त्यापैकी पहिल्या वर्षासाठी मंजूर १ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी.
  • सदर अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचेOn-line  अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर अनुज्ञेयता तपासून राबविण्यात येणार आहे.
  • यात2.5 एकर क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास ३ HP, ५ एकर क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास ५ HP व त्यापेक्षा जास्त  क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास 7.5 HP DC पंप आस्थापित करण्याचे नियोजित.
  • सौर कृषीपंपाची किंमत रु.1.56 लक्ष (३ HP), रु. 2.225 लक्ष (5 HP), रु. 3.435 लक्ष (7.5 HP)
  • पंपाच्या किंमतीच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषीपंपाच्या किंमतीच्या10 % व अनुसूचीत जाती व जमातीच्या लाभार्थ्याकडून 5 % या दराने अंशदान घेणार.
  • या योजनेंतर्गत केंद्र शासनाचे30 टक्के वित्तीय  सहाय्य व राज्य शासनाचे 60/65 टक्के अनुदान व लाभार्थ्यांचे 10/5 टक्के अंशदान लागणार.
  • एकूण उद्दिष्टांपैकी प्रथम टप्प्यात 50 टक्के सौर कृषी पंप हे 34 जिल्ह्यात त्या जिल्हयाच्या लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर तदनंतर मागणीनुसार वितरण करण्याचे नियोजन.
  • सौर कृषी पंपाव्दारे उपलब्ध होणाऱ्या वीजेमुळे जर शेतकऱ्याला इतर वीज उपकरणांच्या वापरासाठी स्वखर्चाने युनिव्हर्सल सौर पंप कंट्रोलर लावण्याची सोय.

कुसुम सोलर पंप योजनेतर्गत पुढील 5 वर्षात 5 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास तर त्यापैकी 2021 या वर्षासाठी मंजूर १ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

सदर अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचे On-line अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर सौर कृषी पंप दिले जाणार आहेत.

Online Application link
👇👇

कागदपत्रं 

1) ७/१२ उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. २००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
2) आधारकार्ड प्रत.
3) रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत,
4) पासपोर्ट आकाराचा फोटो,
5) याच बरोबर शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र ही सादर करावे लागेल.

अर्ज भरण्यासाठी पात्र असलेल्या सेफ व्हिलेज ची लिस्ट GSDA कडून देण्यात आली आहे, या लिस्ट मध्ये नाव असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना यात अर्ज करता येतील, 
मात्र जरी लिस्ट मध्ये गावाचे नाव नसेल तरी आपण अर्ज करू शकता त्यासाठी आपण सिंचनासाठी डिझेल पंप वापरत आहे या ऑपशन मध्ये होय वरती क्लिक करून अर्ज भरु शकता.

अर्ज पूर्ण भरल्यावर आपणास कोटेशन दिले जाईल त्यानुसार पैसे ७ दिवसाच्या आत मध्ये भरावे लागतील अन्यथा ते अपात्र ठरवले जाईल 

बँक डिटेल देणे महत्वाचे आहे जेणे करून अर्ज बाद झाल्यास केलेला भरणा खात्यात जमा होईल.


saur krishi pump yojana maharashtra