पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजनेला मंजुरी | roof top solar scheme 2025
पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजनेला मंजुरी roof top solar scheme 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने छतांवर सौर पॅनल (आर टी एस)बसवण्यासाठी आणि 1 कोटी कुटुंबांना दर महिना 300 युनिट्सपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी 75,021 कोटी रुपये खर्चाच्या पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजनेला मंजुरी दिली आहे. पंतप्रधानांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी ही योजना सुरू केली होती. या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये : घरगुती सौर पॅनल साठी केंद्रीय आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत 2 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी खर्चाच्या 60% आणि 2 ते 3 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी अतिरिक्त प्रणाली खर्चाच्या 40% केंद्रीय आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. सध्याच्या प्रमाणित किंमतीनुसार , 1 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी 30,000 रुपयांचे अनुदान , 2 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी 60,000 रुपयांचे अनुदान , 3 kW आणि त्याहून अधिक क्षमतेच्या प्रणालीसाठी 78,000 रुपयांचे अनुदान , दिले जाईल. सर्व कुटुंबाना राष्ट्रीय पोर्टलच्या माध्यमा...