कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू | Kunbi Caste certificate
कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू Kunbi Caste certificate राज्यात कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यासाठी मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीच्या दि. 24 ऑक्टोबर 2023 रोजीच्या स्थापनेपासून उपविभागीय स्तरावर सुरू आहे. याचबरोबर २ सप्टेंबर २०२५ शासन निर्णय नुसार हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांना सहाय्य करण्याच्या उद्देशाने या समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. या शासन निर्णयानुसार मराठा समाजातील भूमिधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करणाऱ्या व्यक्तीकडे शेतजमिनीच्या मालकीचा पुरावा उपलब्ध नसल्यास त्यांनी दि. 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी स्वतः किंवा त्यांच्या पूर्वजांचे संबंधित स्थानिक क्षेत्रात वास्तव्य असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. या प्रतिज्ञापत्रासोबत सादर करण्यात आलेल्या अनुषंगिक पुराव्यांची सक्षम प्राधिकाऱ्यांकडून स्थान...