राज्यात ७२ खासदार होणार; केंद्राची लोकसभा विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेची तयारी || delimitation Process
राज्यात ७२ खासदार होणार; केंद्राची लोकसभा विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची तयारी Delimitation Process केंद्र शासनाच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची तयारी सुरू केलेली आहे. 23 मार्च 2026 रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या संदर्भातील एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. NDA चे मित्रपक्ष, वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये २०१११ च्या लोकसंख्येनुसार देशांमध्ये लोकसभा आणि विधानसभाच्या मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. यापूर्वी देखील अशाच प्रकारे तयारी सुरू करण्यात आलेली होती मात्र दक्षिणात्य राज्यांचा विरोध पाहता ही प्रक्रिया बारगळली होती, कारण लोकसंख्येच्या आधारावरती जर लोकसभा विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचना झाल्या तर यामध्ये उत्तरेकडील राज्यामध्ये जास्त खासदार येऊ शकतात. मात्र आता पुन्हा एकदा केंद्र शासनाच्या माध्यमातून ही तयारी सुरू करण्यात आलेली आहे, सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच याच्या संदर्भातील कायदा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्य...