बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, Birsa Munda Krishi Kranti Yojana 2024
अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना विविध बाबी करिता अनुदान देणारी एक महत्वाची योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना BIRSA MUNDA KRUSHI KRANTI YOJANA . जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना ही आदिवासी शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. NEW GR 01.10.2024 अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेच्या (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटक समाविष्ट या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.4 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.1,00,000), इनवेल बोअरींग (रु.40 हजार), पंप संच (रु.40 हजार), वीज जोडणी आकार (रु.20 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.2 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.97 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.47 हजार), पीव्हीसी पाईप (रु.40 हजार), परसबाग (रु.5000), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. पात्रता लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकार...