सोलर पंप योजनेला नवी मंजुरी | Solar pump yojna Maharashtra
सोलर पंप योजनेला नवी मंजुरी Solar pump yojna Maharashtra दिनांक ०७ एप्रिल २०२२ एक अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत 100 टक्के अनुदानावर सोलर पंप योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी राज्य शासनाने 26 ऑगस्ट २०२१ रोजी एक शासन निर्णय घेऊन राज्यातील वनपट्टे धारकांचे जमातीच्या लाभार्थ्यांना करता 100 टक्के अनुदानावर विहीर आणि 100 टक्के अनुदानावर सोलर पंप योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये ही योजना राबविणे तसेच नवीन विहिरी साठी अडीच लाख रुपये तर सोलर पंपासाठी अडीच लाख रुपये अशा प्रमाणामध्ये हा निधी खर्च केला जाणार होता मात्र हि मंजुरी रद्द करून नवीन शासन निर्णय घेऊन या योनेल नवीन मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे या योजनेत आता नवीन विहिरीसाठी तीन लाख रुपये तर सोलर पंपासाठी तीन लाख 25 हजार रुपये एवढे अनुदान निश्चित करण्यात आले आहे. मित्रांनो एकंदरीत हि योजना कशाप्रकारे राबवली जाणार आहे,...