पशुधन विमा योजना अर्ज सुरू, काय आहे योजना | NLM LiveStock Insurance Scheme
राज्यात पशुपालकांसाठी राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पशुधन विमा योजना. पशुधन विमा योजना ऑनलाईन अर्ज सुरू NLM LiveStock Insurance Scheme Maharashtra 2026 शेतकरी-पशुपालकांनी लाभ घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन राज्यभरातील पशुपालकांच्या पशुधनाला विविध आजार, अपघात व नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देण्यासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (NLM) 'पशुधन विमा योजना' राबवण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेसाठी शेतकरी-पशुपालक बांधवांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली असून दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी 'ॲग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया लि.' (AIC) या कंपनीसोबत पशुसंवर्धन विभागाने सामंजस्य करार (MoU) केल्याची माहिती मा. आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य डॉ. किरण पाटिल (भा.प्र.से.) यांनी दिली. पशुधन विमा योजनेमुळे पूर, वीज पडणे, अपघात आणि विषबाधा, तसेच पशुधनाचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास पशुधन गमावणाऱ्या पात्र पशुपालक / शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत विमा हप्त्याची ८५% रक्कम केंद्र व राज्य...