Auto Riksha Permit 2026 रिक्षा-टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मुदत; परिवहन मंत्री आक्रमक
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवाना देण्यास स्थगिती राज्य शासनाचा मोठा निर्णय रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यवहारिक मराठीचे धडे; १५ ऑगस्टनंतर मुदतवाढ नाही — मंत्री प्रताप सरनाईक Auto Riksha Permit 2026 परिवहन विभागाकडून राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यवहारिक मराठी आत्मसात करता यावी यासाठी दररोज चार तासांचे ऑफलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात मराठी संभाषण कौशल्य विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येणार असून ऑनलाइन प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परिवहन विभागाकडून दिले जाणारे प्रशिक्षण अधिक प्रभावी आणि सुलभ व्हावे यासाठी विविध शाखा कार्यालयांमध्ये विशेष वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, पालघर आणि डहाणू या भागांत प्रारंभी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातूनही मराठी शिकविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सुमारे ४५०० शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना मानधन दिले जाणार ...