स्पर्शविरहित बायोमेट्रिक कॅप्चर प्रणाली | touchless biometric capture system
स्पर्शविरहित बायोमेट्रिक कॅप्चर प्रणाली UIDAI - IIT Bombay join hands to develop touchless biometric capture system लोकांना कधीही, कोठेही वापरता येणारी स्पर्शविरहित बायोमेट्रिक कॅप्चर प्रणाली विकसित करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ( Unique Identification Authority of India (UIDAI) ) ने भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी - बॉम्बे) सोबत सामंजस्य करार केला आहे. सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून, युआयडीएआय आणि आयआयटी बॉम्बे फिंगरप्रिंटसाठी कॅप्चर प्रणालीसह एकत्रित केलेल्या लाइव्हनेस मॉडेलसह मोबाईल कॅप्चर प्रणाली तयार करण्यासाठी संयुक्त संशोधन करतील. स्पर्शविरहित बायोमेट्रिक कॅप्चर प्रणाली, एकदा विकसित आणि कार्यान्वित झाल्यानंतर, चेहऱ्यावरून ओळख पटवण्याप्रमाणेच घरातून फिंगरप्रिंट प्रमाणीकरणास अनुमती देईल. नवीन प्रणाली एकाच वेळी अनेक फिंगरप्रिंट्स कॅप्चर करेल आणि प्रमाणीकरण यशस्वी होण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे. नवीन प्रणाली एकदा अस्तित्वात आल्यावर आधार परिसंस्थेत उपलब्ध असलेल्या सध्याच्या सुविधांमध्ये भर पडेल. वापरकर्ता म्हणून चांगला अनुभव असलेल्या आणि बह...