पोस्ट्स

माझीशेतीमाझासातबारामीचनोंदविणारमाझापीकपेरा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा || e peek pahani maharashtra

इमेज
माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा   राज्य शासनाने पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: मोबाईल ॲपद्वारा उपलब्ध करून देण्याबाबतचा ‘ई-पीक पाहणी’ e peek pahani कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेल्या अँप्लिकेशन चा वापर करून 15 ऑगस्टपासून राबविण्यास सुरुवात केली आहे. ई-पीक पाहणीद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक पाहणीची जलद, वस्तूनिष्ठ आणि पारदर्शक पध्दतीने माहिती संकलित करण्यात येणार आहे.आणि तलाठ्यांचे काम सोपे होण्यास मदत होईल. ॲपच्या माध्यमातून अधिप्रमाणित रिअल टाइम डेटा उपलब्ध होणार आहे. मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे स्वत:च्या शेतातील उभ्या पिकांची माहिती, अक्षांश-रेखांश दर्शविणाऱ्या पिकांच्या छायाचित्रासह उपलब्ध होऊ शकेल. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. ई-पीक पाहणीचे फायदे- शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेच्या थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. गाव, तालुका, जिल्हा आणि विभाग निहाय पिकाखालील क्षेत्रा...