गारपीट अवकाळी पावसाने नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश || Avkali Nuksan 2026

गारपीट अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे कृषिमंत्र्यांचे आदेश.

Avkali Nuksan 2026

राज्यात काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या नुकसानीचे पंचमाने तातडीने करण्याच्या सूचना कृषिमंत्री यांनी आज दिल्या.

बऱ्याच तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे शेतपिकांच्या नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. 

त्यामुळे संबंधित तालुक्यातील सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. यासोबतच घरांची पडझड झालेल्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी. 

आगामी काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा असल्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे. वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या आहेत.

प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार शुक्रवारी काही ठिकाणी वादळी वारे व गारपीट झाली. यामुळे काही गावांमध्ये पत्र्याची घरे अंशतः नुकसानग्रस्त झाली आहेत. तसेच गहू, हरभरा व ज्वारी फळबागांचे पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.