अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर; नियमित कर्जदारांना ५०,००० अनुदान Shetkari Karjmafi Yojana 2026

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर; नियमित कर्जदारांना ५०,००० प्रोत्साहनपर अनुदान

Shetkari Karjmafi Yojana 2026

राज्याच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे.

शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते त्याकरिता समिती गठीत केलेली आहे.

राज्यातील 30 सप्टेंबर पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे.


याचबरोबर जे शेतकरी आपल्या पीककर्जाची नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्जमाफी तसेच प्रोत्साहन पर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रना सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येणार आहे.

या कर्जमाफी साठी थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती बँकांना सादर करण्याचे सहकार विभागाने निर्देश दिलेले होते. या अनुसार मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीकृत बँक, वानिजीक बँक कडून राज्यस्तरीय बँकर्स समितीला माहिती सादर करण्यात आली आहे.


बॅंकचया माध्यमातून ३०सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती सादर केलेली आहे. यात विविध बँकांकडे तब्बल २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकरी अल्प मुदत व माध्यम मुदत कर्ज घेऊन थकबाकीदार आहेत. या शेतकऱ्यांकडे बँकांची ३५ हजार ४७७ कोटी रुपयांची कर्जे थकीत आहेत. यामध्ये नाशिक, सोलापूर, अकोला, जळगाव, कोल्हापूर,धाराशिव, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे,

शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी गठीत करण्यात आलेली समिती लवकरच आपला अहवाल सादर करेल. हा अहवाल आल्यानंतर अटी शर्ती पात्रतेचे निकष ठरवून कर्जमाफीचा GR काढला जाईल.

Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmafi Yojana