प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2026 | Rabbi PikVima 2026

प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2026

Rabbi PikVima 2026

राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या पीक नुकसानी पासून आर्थिक सरंक्षण मिळवून देण्यासाठी राबवली जाणारी महत्वाची अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री पिक विमा योजना. 

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये आपल्या सात पिकासाठी पिक विमा काढता येणार आहे. ज्यामध्ये रबी ज्वारी, गहू, रब्बी मका, हरभरा, रब्बी कांदा, उन्हाळी भुईमूंग, उन्हाळी भात अशा ७ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.


या योजनेअंतर्गत रब्बी बागायत आणि जिरायत ज्वारी या पिकासाठी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्ज भरता येतील तर गहू बागायत, हरभरा रब्बी, मका आणि रब्बी कांदा या पिकांसाठी 25 डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज भरता येतील. 

तर उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूंग या पिकांसाठी 31 मार्च 2017 पर्यंत शेतकऱ्यांना पिकविमा साठीचे अर्ज भरता येणार आहेत.

रब्बी हंगाम 202627 करता शेतकरी स्वतः PMFBY पोर्टल वरती किंवा क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशनच्या माध्यमातून पिक विमा भरू शकतात. कर्जदार शेतकरी हे बँकेच्या माध्यमातून किंवा जवळच्या सीएससी सेंटर वरती पीक विम्याचे अर्ज करू शकणार आहेत. 

या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ऐच्छिक रित्या आपला सहभाग नोंदवता येणार आहे कर्जदार शेतकऱ्यांना जर योजनेमध्ये सहभागी व्हायचं नसेल तर अंतिम मुदतीच्या किमान सात दिवस आधी बँकेकडे लेखी अर्जाद्वारे कळवण बंधनकारक राहील.