सोसायटीच्या थकीत पिककर्जाबाबत मोठा निर्णय; कर्जमाफीच काय? | Society Pik Karj OTS 2026

सोसायटीच्या थकीत पिककर्जाबाबत मोठा निर्णय; कर्जमाफीच काय?

Society Pik Karj OTS 2026

राज्यातील थकीत कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे कारण राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असताना सहकार मंत्री यांच्या माध्यमातून मात्र राज्यामध्ये प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था यांच्यासाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना राबवायला मंजुरी दिली आहे. 

या योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचे बैठक मंत्रालयात पार पडली राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 

राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था यांच्याकडे थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी एक रकमे कर्ज परतफेड योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. 

या योजनेअंतर्गत 30 जून 2023 अखेर पर्यंत ची थकीत पीक कर्ज तसेच मध्यम व दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाचे थकीत हप्ते समाविष्ट करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. 

याचबरोबर एका सभासदाकडे एकापेक्षा अधिक कर्ज खाते असल्यास ती सर्व खाते या एकरकमी कर्ज परतफेड योजनेत पात्र ठरणार आहेत. 

राज्यात सध्या शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना घोषित करण्यात आलेले आहे. 

अद्याप या योजनेच्या संदर्भातील अभ्यास गट समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला नाही याचबरोबर कोणते शेतकरी आणि कधीपासूनचे कर्ज या योजनेअंतर्गत पात्र होणार आहे हे निश्चित करण्यात आलेलं नाही.  असे असताना राज्यामध्ये 30 जून 2023 पूर्वीच्या थकीत कर्जासाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबवण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण होण्याचे शक्यता आहे.