Pm Kisan 23 वा हप्ता वितरणापूर्वी शेतकऱ्यांसाठी गोड खबर; लाभार्थी संख्येत वाढ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता वितरणापूर्वी शेतकऱ्यांसाठी गोड खबर; लाभार्थी संख्येत वाढ

Pm Kisan 23rd Instalment

Pm Kisan 22nd Instalment

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. याच पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी वितरित केला आहे.

साधारणता जून किंवा जुलै या महिन्यामध्ये पीएम किसान सन्मान नधी योजनेचा पुढील अर्थात 23 वा हप्ता वितरित केली जाण्याची शक्यता आहे.

हा पीएम किसान 23 वा हप्ता वितरित केला जात असतानाच एक मोठी खुशखबर येत आहे. या योजनेच्या अंतर्गत 32 लाख लाभार्थी हे या 23 व्या हप्त्यासाठी नव्याने पात्र होत आहेत.

ज्या लाभार्थ्यांची वारसांना जमिनीची नोंद झालेली आहे, रजिस्ट्रेशन झालेलं होतं परंतु  केवायसी किंवा इतर कारणास्तव अद्याप पर्यंत हप्ता वितरित करण्यात आलेला नव्हता. ज्या शेतकऱ्यांचे आधार सीडिंग, लँड शेडिंग किंवा इतर काही कारणास्तव हप्ते येत नव्हते. असे जवळजवळ 32 लाख शेतकरी 23 व्या हप्तासाठी नव्याने पात्र करण्यात आलेले आहेत.

Pm kisan योजनेचा 22 वा हप्ता वितरित केला जात असताना 9 कोटी 32 लाख 3 हजार 89 शेतकऱ्यांना 18 हजार 640 कोटी रुपयांच वितरण करण्यात आलं होतं.

pm kisan 22

याचप्रमाणे राज्यामध्ये पीएम किसानचा 22 वा हप्ता 89 लाख शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित करण्यात आला होता. मात्र आता 23 वा हप्ता  वितरित केला जात असताना 93 लाखापेक्षा जास्त लाभार्थी यांच्यामध्ये पात्र होण्याची शक्यता आहे, याच्या संदर्भातील आकडेवारी राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर केली जाईल. 

एक मोठा दिलासा या शेतकऱ्यांना आता मिळणार आहे. याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या संदर्भातील देखील मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत, लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून या संदर्भातील काही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.