Kharip Pikvima खरीप पीकविमा २०२५ च्या वाटपासाठी कंपनीला पत्र

कालावधी उलटूनही पीकविमा वाटप नाही; वाटपासाठी विमा कंपनीला कृषी अधीक्षकाचे पत्र

Kharip Pikvima 2025

खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, या पार्श्वभूमीवर पीकविमा मिळावा ही शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे.

पीकविमा वाटपासाठी कालावधी उलटून गेला तरी पीकविमा वाटप होत नसल्याने राज्यात निरनिराळ्या जिल्ह्यात शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसत आहेत.



नांदेड जिल्ह्यात झालेले नुकसान पाहता खरीप 2025 चा पीकविमा मिळावा अशी मागणी केली जात आहे, यासाठी शेतकरीपुत्र संघर्ष समिती कडून जिल्हा कृषी अधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले होते.

पीकविमा वाटपाची प्रक्रिया पार पाडावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा या पत्रातून देण्यात आला होता.

याच निवेदनाच्या आधारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी राज्य व्यवस्थापक भारतीय कृषी विमा कंपनी यांना पीकविमा वाटपाची कारवाई करावी अशी मागणी आता पत्राद्वारे करण्यात आली आहे.

आता पीकविमा कंपनी काय भूमिका घेतेय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

एकंदरीत कालावधी लोटला तरी, शासनाने सर्व पिक कापणी रिपोर्ट सादर केल्यानंतर ही पीकविमा वाटपाची कारवाई केलेली नाही.

केंद्रीय कृषी मंत्री, राज्य कृषी मंत्री यांनी पाठपुरावा केल्यानंतर ही अद्याप पीकविमा वाटपाची प्रक्रिया सुरू न झाल्याने शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे.