पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना
Gharkul yojana 2026
GR PDF 09.03.2026
या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात येणार अनुदान
ntc gharkul 2026
धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेंतर्गत निधी वितरीत करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
GR 27.02.2026
GR 11.02.2026
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत सन 2023-24 व 2024-25 मध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी निधी९ जिल्हा लाभार्थी यादी खालील लिंक वर पहा
धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेंतर्गत जिल्हाधिकारी, लातूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने मंजूरी दिलेल्या एकूण ८३३ वैयक्तिक लाभार्थ्यांच्या प्रस्तावास संदर्भाधिन दि.३१/३/२०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली असुन मान्यता देण्यात आलेल्या ८३३ लाभार्थ्यांना संबंधित शासन निर्णयांतील तरतुदीप्रमाणे अनुज्ञेय असलेला रु.९,९९,६०,०००/- (अक्षरी रुपये नऊ कोटी नव्व्याण्णव लाख साठ हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
सदरचा निधी वितरीत करण्यासाठी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना - नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असुन त्यांनी सदरहू निधी संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई या कार्यालयालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (BEAMS) द्वारे वितरीत करावा.
सदर निधी खालील यादीतील पात्र ८३३ लाभार्थ्याच्या बँक खात्यात, सार्वजनिक वित्तीय व्यवस्था प्रणालीद्वारे (Public Financial Management System-PFMS) थेट लाभार्थी वितरण पध्दतीने (Direct Beneficiary Transfer DBT) बांधकामाच्या टप्प्यानुसार थेट जमा करण्यात येत आहे.