मनरेगा मजुरांसाठी 67 कोटी; तात्काळ मजूरी वितरण || MGNREGA Wages 2026

होळीच्या सणासाठी मनरेगा मजुरांना अकुशल मजुरी वाटप; दोन दिवसात वितरण 

MGNREGA Wages 2026

राज्यात गेल्या अनेक दिवसापासून मनरेगा MGNREGA योजनेअंतर्गत कुशल बिल व अकुशल मजुरी वितरण बाकी आहे.

राज्य आणि केंद्र शासनाचा निधी उपलब्ध असताना देखील या निधीचे वितरण करण्यात आलेले नाही यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.


यातच आता होळीच्या सणानिमित आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना तातडीने अकुशल मजुरी अदा करण्यासाठी ६७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या वितरीत करण्यात आलेल्या निधीची देयके कोषागाराकडे सादर करण्यात आलेली असून पुढील दोन ते तीन दिवसांत अकुशल मजुरीची रक्कम थेट मजुरांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा केली जाणार आहे.

राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अकुशल मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. 

या मेळघाट, पालघर तसेच इतर आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये मजुरांना काम देताना वाढीव लेबर बजेट मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे विचाराधीन असल्यामुळे काही कालावधीपासून मजुरी अदा करणे प्रलंबित होते.

अखेर हा प्रलंबित प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

19 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्र शासनाने राज्याच्या 13 कोटी मनुष्यदिवसांच्या लेबर बजेटमध्ये वाढ करून सुधारित 16 कोटी मनुष्यदिवसांच्या बजेटला मान्यता दिली आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होऊन मजुरी वेळेत अदा केली जाईल.