भेडवळच भाकीत, कसा राहील पावसाळा, पिक पाणी
Bhedval
३०० वर्षाची परंपरा असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर होणार्या भेंडवळ भविष्यवाणी कडे राज्यातील सामान्यांसोबतच शेतकर्यांचेही लक्ष लागलेले असते. याच भेंडवळ भविष्यवाणीची घोषणा आज १ मे गुरुवारी रोजी करण्यात आली.
यंदाच्या भेंडवळ भविष्यवाणीनुसार, राज्यात पाऊस चांगला असणार पीक ही साधारण असणार आहेत.यावर्षी पावसासोबतच अवकाळी पाऊस, पुराचा धोका असणार आहे. देशामध्ये नैसर्गिक संपत्तीचं संकट असेल. देशाचा राजा कायम राहील अशा घोषणा करण्यात आल्या आहेत.
बुलडाना जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे ही घट भरणी केली जाते. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या भेंडवळच्या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकरी वर्षभराच्या पीक पाण्याचे नियोजन करत असतात. विज्ञानाच्या आधुनिक युगातही ही भेंडवळची परंपरा जपली जात आहे.
- पिकांचे अंदाज
- कापूस - सर्वसाधारण
- ज्वारी पिक - अनिश्चित
- तूर पिक - साधारण
- मुंग पिक - साधारण
- उडीद पिक - सर्वसाधारण/ तेजी/
- तिळ पिक - सर्वसाधारण
- भादली - रोगराई राहणार
- बाजरी पिक - चांगले
- तांदूळ पिक - चांगले/ भावात तेजी
- मठ पिक - साधारण
- जवस पिक - साधारण /नासाडी
- लाख पिक - चांगले /भावत तेजी
- वाटाणा पिक - साधारण
- गहू पिक - साधारण
- हरबरा- साधारण
- करडी – साधारण
- मसूर - साधारण
- अंबाडी – साधार