नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज सुरू ! | Fair price shop license application

नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज सुरू

Manifesto Approval of fair price shops 

कोल्हापूर, अमरावती जिल्ह्यात अर्ज मागविले.


महाराष्ट्र शासनाचे रास्तभाव / शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजूर करणेबाबत  शासन निर्णयानुसार सध्याचे रास्तभाव दुकान परवाने तसेच ठेवून आजमितीस रद्द असलेले व यापुढे रद्द होणारे, राजीनामा दिलेले व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाचे तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाचे रास्तभाव दुकाने मंजूर करावयाचे आहेत.

यासाठी कोल्हापूर , अमरावती जील्ह्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

रिक्त ठिकाणांसाठी अर्ज संबंधीत तहसिल कार्यालयाचे पुरवठा शाखेमध्ये रु.१०/- शासनजमा करुन घेऊन उपलब्ध होतील. सदरचे अर्ज दिनांक 13.02.2023  ते दिनांक 28.02.2023  पर्यंत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळून) संबंधीत तहसिल कार्यालयाचे पुरवठा शाखेमध्ये स्विकारण्यात येतील.

उपरोक्त नमूद शासन निर्णयानुसार इच्छूक पंचायत/संस्था/गट यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधीत तहसील कार्यालयाकडे मुदतीत अर्ज सादर करावेत. 

मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

दुकान निवडी साठी प्राधान्यक्रम


१ पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था)

२. नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट,

३. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, ४. संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास

५. महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था

संबंधीतांनी अर्ज केल्यानंतर प्राधान्यक्रमानुसार रास्तभाव दुकान परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाव्दारे करणे आवश्यक राहील. प्राधान्य सूचीनुसार पंचायत / संस्था/ गटांची निवड करताना जेष्ठ, वर्धनक्षम व नियमित कार्यरत असलेल्या व अंतर्गत व्यवहार पारदर्शक व परतफेड चोख व नियमित असलेल्या व प्रतिवर्षी लेखापरिक्षण केलेल्या पंचायत / संस्था/गटास प्राधान्य देण्यात येईल.

नविन स्वस्तधान्य दुकान मिळणेकामी अर्ज केलेल्या पंचायत / संस्था/ गटांची आर्थिक स्थिती ही किमान ३ महिन्याचे धान्य उचलण्या इतकी सक्षम असावी.

अर्ज करताना अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.


१. पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था) यांचेसाठी ग्रामसभेचा ठराव, ग्रामपंचायतचा दुकान मागणी अर्ज, तेरीज पत्रक, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेबाबत गटविकास अधिकारी यांचा दाखला.

२. पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्यसंस्था), नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास यांचे नोंदणी प्रमाणपत्र.

३. पंचायत / स्वयंसहायता गट/संस्था/ सार्वजनिक संस्था/ न्यास यांचे आर्थिक स्थितीबाबत कागदपत्र जसे बँक पासबुकची छायांकित प्रत व बँकेचे प्रमाणपत्र / बँक स्टेटमेंट.

४. व्यवसाय करावयाच्या जागेचे मालकीबाबत कागदपत्र, जागा भाड्याची असल्यास भाडेपत्र, घर, टॅक्स पावती, ७/२, जागेचे क्षेत्रफळ, व्यवसाय ठिकाणाचे क्षेत्रफळ चौ. फुटमध्ये.


५. बँकेकडून कर्ज घेतले असल्यास कर्जाचा तपशील व परतफेडीचे प्रमाणपत्र (बँकेचे) व कर्जाची नियमित परतफेड चालू असलेबाबत संबंधीत बँकेचे प्रमाणपत्र व कर्जाची परतफेड झाली असल्यास संबंधीत बँकेचे कर्ज पूर्ण फेड केल्याबाबतचे प्रमाणपत्र.

६. पंचायत /स्वयंसहायता गट /संस्था/ सार्वजनिक संस्था / न्यास यांचे वार्षिक लेखे व हिशोब सन २०१८-१९ पासून आजपर्यंत तपासणी केलेल्या संस्थेचा अहवाल. ७. पंचायत /स्वयंसहायता गट /संस्था/सार्वजनिक संस्था/ न्यास यांचे अध्यक्ष/उपाध्यक्ष / सचिव व सर्व सभासदांची नावे, पूर्ण पत्यासह.

८. पंचायत / स्वयंसहायता गट /संस्था/ सार्वजनिक संस्था/ न्यास यांचे मूळ व आजचे भागभांडवल व सध्या करीत असलेले व्यवसाय व कार्याची संपूर्ण माहिती. ९. रास्तभाव दुकान परवाना मिळण्याबाबत व व्यवसाय करण्यासाठी संमती दर्शविलेला पंचायत /स्वयंसहायता गट /संस्था/ सार्वजनिक संस्था / न्यास यांचा ठराव.


१०.पंचायत /स्वयंसहायता गट /संस्था/ सार्वजनिक संस्था / न्यास स्वस्त धान्य दुकान स्वतः एकत्रितरित्या चालवतील, कोणीही इतर व्यक्तीस अथवा संस्थेस चालविण्यास देणार नाही किंवा हस्तांतरीत करणार नाही याबाबत प्रतिज्ञापत्र.

११. भाडे तत्वावर दिल्या गेलेल्या जागेसंबंधी मूळ जागा मालकाचे विधीग्राह्य दस्तऐवज.

१२. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे नावे अन्य कोठेही शिधावाटप दुकान कार्यान्वित नसल्याचे रु.१००/- च्या स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र. (सदरची माहिती खोटी असल्याचे भविष्यात निदर्शनास आल्यास नियमाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल)

१३. पंचायत /स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे सदस्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत रु.१००/- च्या स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र.

१४. स्वयंसहायता गटाचे सभासद दारिद्य रेषेखालील असल्यास शिधापत्रिका / ग्रामसेवकांचे पत्र / नगरपालिकेकडील पत्र .

अमरावती जिल्हा ग्रामीणमधील स्वस्त धान्य दुकान परवाने मंजूरीसाठी खाली नमूद तालुकानिहाय गावी /ठिकाणी नवीन रास्तभाव दुकान देणेकामी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी एकूण 22 नवीन रास्तभाव धान्य दुकानांसाठी सन 2023 चा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. 

इच्छुक संस्थांनी, महिला बचतगटांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी विहीत मुदतीत सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले आहे.


रास्तभाव दुकान व गावाची/क्षेत्राची नावे पुढीलप्रमाणे-

  1. करवीर तालुका- केर्ले, घानवडे, तामगाव, गोकुळ शिरगाव कोगे, व परीते. 
  2. भुदरगड तालुका- तांब्याचीवाडी. 
  3. हातकणंगले तालुका- पट्टणकोडोली (अलाटवाडी क्षेत्राकरिता), हातकणंगले, रेंदाळ व रांगोळी. 
  4. गडहिंग्लज तालुका- नौकुड, मुतनाळ, हेब्बाळ कसबा नूल, भडगाव, हेळेवाडी व बेळगुंदी. 
  5. चंदगड तालुका- आमरोळी व जंगमहट्टी. 
  6. आजरा तालुका- जाधेवाडी व भावेवाडी 
  7. कागल तालुक्यातील यमगे याप्रमाणे आहे.

नवीन रास्तभाव धान्य दुकानाकरिता अर्ज करण्याकरिता वेळापत्रक पुढीलप्रमाणे-

  •  नवीन रास्तभाव दुकान परवाने मंजूर करण्याकरिता जाहीरनामा काढणे व प्रसिध्द करणे- दि. 13 जानेवारी 2023
  •  संस्थांना अर्ज करण्यास मुदत- 13 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2023
  • प्राप्त अर्जांची प्राथमिक तपासणी, छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही पूर्ण करणे- दि. 13 फेब्रुवारी ते 12 मार्च 2023 व 
  •  नवीन दुकाने मंजुर करणे- दि. 13 मार्च ते 12 एप्रिल 2023 याप्रमाणे राहील.

अर्ज करण्यासाठीच्या पात्रतेचे निकष ,अटी व शर्ती संबंधित तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती, गाव चावडी व संबंधित ग्रामपंचायत येथे प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. 

अर्जदार संस्थांनी अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी संबंधित तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.