शेतकऱ्यांसाठी सर्व कृषी योजनांचे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू.
Mahadbt farmer Scheme 2022
कृषि यांत्रीकीरण उपअभियान/ राज्य पुरस्कृत कृषि यांत्रीकीकरण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना.
Mahadbt farmer Scheme 2022
कृषि विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” ( Mahadbt farmer Scheme 2022 ) या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाव्दारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीव्दारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य, भरडधान्य, पौष्टीक तृणधान्य व कापुस विकास कार्यक्रम, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन २०२२ या वर्षासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्रय देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरीता अर्ज करावयाचा आहे.
शेतकरी या योजनांचे अर्ज स्वत:च्या मोबाईल, संगणक / लॅपटॉप/ टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC) ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल.
ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये ( mahadbt farmer scheme ) नमूद करुन त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापुर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
( Mahadbt farmer Scheme 2022 ) पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईल लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.
मात्र शेतकरी लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करु शकतात. ज्या शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी आपले अर्ज पोर्टलवर भरावेत सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महा –डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.