जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन | Cast validity 2022

 जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

Cast validity 2022

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या तथापि, अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला नाही अशांनी तत्काळ ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी, पुणे यांनी एका केले आहे.

शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या असून, चालू शैक्षणिक वर्षात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर न केलेल्या विद्यार्थ्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे त्याच जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विलंबाबाबतच्या हमीपत्रासह त्वरित सादर करावी.

जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यास आरक्षणातून प्रवेश न मिळाल्यास होणाऱ्या नुकसानीस जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जबाबदार राहणार नाही, असे हमीपत्र अर्जदाराने अर्जाच्या प्रतीसोबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. 

हमीपत्राचा नमुना PDF संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे हमीपत्राचा नमुना उपलब्ध आहे.

Download Hamipatra here

PDF