अतिवृष्टी भरपाई संधर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय | Ativrushti nuksan bharpai 2022

अतिवृष्टी भरपाई संधर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय

Ativrushti nuksan  bharpai 2022

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची आज मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

सततच्या पावसाने बाधित पण 65 मि मी. च्या निकषात न बसणाऱ्या राज्यातील आणखी 6 लाख शेतकऱ्यांना ₹755 कोटींची मदत या बैठकीत मंजूर करण्यात आली. निकषात बसणाऱ्या 30 लाख शेतकऱ्यांना ₹3600 कोटी यापूर्वीच वितरित करण्यात आले आहेत.

आता आणखी 6 लाख शेतकऱ्यांना ₹755 कोटी मदत मिळणार आहे. ही मदत निकषात बसत नव्हती. मात्र विशेष बाब म्हणून आज मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली. यामुळे आणखी 5,49,646 हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे.