बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन, दलालांना थारा नाही | Bandhkam Kamgar nondani Maharashtra

बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईनच

प्रथम नोंदणीसाठी 37 रुपये तर वार्षिक नुतणीकरणासाठी केवळ 12 रुपये शुल्क


नोंदणीसाठी कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही, दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये


महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणी, नुतणीकरण व विविध कल्याणकारी योजनेचा लाभ वाटपाची प्रक्रिया ऑनलाईन सुरु असून याकरीता मंडळानी www.mahabocw.in ही वेबसाईट विकसीत केलेली आहे.

त्याअनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना कळविण्यात येते की, मंडळामध्ये प्रथम नोंदणी करण्याकरीता रुपये 25 नोंदणी शुल्क तसेच वार्षीक सभासद वर्गणी रु. 12 असे एकूण 37 रुपये शुल्क आकारले जाते. तसेच दरवर्षी नोंदणीचे नुतणीकरण करणे आवश्यक असून रु. 12 वार्षीक नुतणीकरण शुल्क आकारण्यात येते.

नोंदणी कशी करावी काय आहेत योजना पहा खालील लिंक वर 

https://grnshetiyojna.in/bandhkam-kamgar-yojana-2022/

कामगारांचा अर्ज मंजूर झाल्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर सदर शुल्क ऑनलाईन भरण्याबाबत लिंक नोंदित मोबाईल क्रमांकावर पाठविल्या जाते. सदर लिंकवर जावून विहीत शुल्क भरावे. 

या व्यतीरिक्त कोणतेही शुल्क मंडळाकडून आकारले जात नाही. कार्यालयाकडून कोणत्याही दलाल, मध्यस्थी (एजंट) किंवा अन्य व्यक्ती यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणासही पैसे देण्याची आवश्यकता नाही. तरी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये व फसगत करुन घेवू नये असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, यांनी केले आहे.