किसान सन्मान निधी योजना खाते दुरुस्ती सुरू | PM Kisan

किसान सन्मान निधी योजना खाते दुरुस्ती सुरू 

PM Kisan Edit farmer details campaign start in Maharashtra 

शेतकऱ्यांना वार्षिक ₹६,००० अर्थसाहाय्य देणारी महत्वाची योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ( PM KISAN sanman nidhi yojana ) 

PM Kisan Edit farmer details

PM Kisan Edit farmer detailsप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रलंबित डाटा दुरुस्तीसाठी
गाव पातळीवर 25 मार्च रोजी शिबिराचे आयोजन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी, 2019 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यात 114.93 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 109.33 लाख पात्र शेतकऱ्यांना मदत म्हणून 18120.23 कोटी रुपये रकमेचे वितरण करण्यात आले आहे. या योजनेतील अनेक लाभार्थी हे डाटा दुरुस्तीच्या कारणामुळे न्याय लाभापासून वंचित आहेत. 


आजमितीस राज्यात 8.53 लाख डाटा दुरुस्ती करणे प्रलंबित आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 
  • बँक ट्रान्झॅक्शन फेल्यूअर डाटा 2.51 लाख, 
  • आधार दुरुस्ती 1.18 लाख, 
  • पीएफएमएस ने नाकारलेला डाटा 0.65 लाख , 
  • स्वयंनोंदणीकृत लाभार्थी प्रलंबित दुरुस्ती 2.62 लाख 
  • इतर दुरुस्ती प्रलंबित डाटा 1.58 लाख आहे. 


याबाबत केंद्र शासनाने नाराजी व्यक्त केली आहे. 

यासाठी राज्य स्तरावर दि. 20 जानेवारी, 2022 रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत प्रलंबित डाटा दुरुस्तीसाठी गाव पातळीवर शिबीर (कॅम्प) आयोजित करुन मोहिम तत्वावर प्रलंबित दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या प्रलंबित कामांचा निपटारा, दुरुस्त्या, भौतिक तपासण्या हि काम तात्काळ पार पाडण्यासाठी एक शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. 

प्रधानमंत्री सन्मान निधी (पीएम किसान)  योजनेच्या प्रलंबित डाटा दुरुस्तीसाठी कॅम्प आयोजित करणे, योजनेतील लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे व अपात्र ठरलेलया लाभार्थ्यांकडुन दिलेला लाभ वसूल करणेबाबत च्या सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत. 

परिपत्रक येथे पहा 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रलंबित डाटा दुरुस्तीसाठी कॅम्पचे आयोजन करणे, योजनेतील लाभार्थ्यांची भौतीक तपासणी करणे व अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून दिलेला लाभ वसूल करणेबाबत.

त्याअनुषंगाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंअंतर्गत प्रलंबित डाटा दुरुस्तीसाठी मार्च महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी म्हणजेच दि. 25 मार्च, 2022 रोजी शिबिराचे (कॅम्प) आयोजन करण्यात आले आहे. हे काम पूर्ण डाटा दुरुस्ती होईपर्यंत चालू राहणार आहे.


यासाठी दि. 15 फेब्रुवारी, 2022 च्या शासन निर्णयानुसार स्थापित तालुकास्तरीय समिती ही तालुक्यातील गावांचे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमध्ये गावांचे वाटप तसेच कॅम्प आयोजित करण्याची जबाबदारी निश्चित करतील. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यास त्या गावातील डाटा दुरुस्तीसाठी असलेल्या लाभार्थींची यादी तहसीलदार कार्यालयामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल. डाटा दुरुस्ती कॅम्पचे आयोजन यशस्वी होण्यासाठी संबंधित सर्व शेतकऱ्यांना एनआयसी मार्फत मोबाईल मेसेज (संदेश) पाठवून त्यांचा अर्ज कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे. याबाबत कळविण्यात येणार आहे. जेणेकरुन डाटा दुरुस्ती न झाल्याने लाभापासून वंचित असलेला लाभार्थी कॅम्पमध्ये सहभागी होऊन आवश्यक ती कागदपत्रे जमा करेल. 
डाटा दुरुस्तीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वत:चे बँक खाते तपशीलासाठी पासबूक किंवा चेकबूक, आधार कार्ड, जमिनीचा सातबारा, आठ अ चा उतारा इत्यादी कागदपत्रे कॅम्पमध्ये दुरुस्तीसाठी द्यावीत. डाटा दुरुस्तीसाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे जमा करुन ती संबंधित कॅम्प आयोजित करणाऱ्या कर्मचाऱ्याने आपल्या तहसील कार्यालयामध्ये जमा करावीत आणि आपल्या जिल्ह्यातील डाटा दुरुस्तीचे काम मार्च, 2022 अखेर शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल.