गरीब आणि दुर्बल घटकांसाठी केंद्राचा मोठा निर्णय | Extension for PM-GKAY 2022

गरीब आणि दुर्बल घटकांसाठी केंद्राचा मोठा निर्णय 

Extension for PM-GKAY 2022

PM-GKAY


प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PM-GKAY) सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी



समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांविषयीची चिंता आणि संवेदनशीलता जपतत्यांना आधार देण्याच्या उद्देशानेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतप्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (PM-GKAY) आणखी सहा महीने म्हणजेचसप्टेंबर 2022 पर्यंत (सहावा टप्पा) मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PM-GKAY) योजनेचा पाचवा टप्पामार्च 2022 मध्ये संपणार आहे. पीएम-जीकेएवाय ची अंमलबजावणी एप्रिल 2020 पासून सुरु झाली असूनही जगातली सर्वात मोठी अन्नसुरक्षा योजना आहे.

सरकारने आतापर्यंत या योजनेवर 2.60 लाख कोटी रुपये निधी खर्च केला असूनपुढच्या सहा महिन्यांसाठीम्हणजेच सप्टेंबर 2022 पर्यंत आणखी 80 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामुळेया योजनेसाठीचा एकूण खर्च 3.40 लाख कोटी रुपये इतका असणार आहे.


या योजनेअंतर्गत, 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्यवाटप केले जाणार असूनत्याचा संपूर्ण खर्च भारत सरकार करणार आहे.

आता कोविडची लाट जवळपास नियंत्रणात आली असलीआणि देशभरात सर्व आर्थिक व्यवहारांनाही गती मिळाली असलीतरीही आर्थिक व्यवस्था सुरळीत होण्याच्या काळातकोणतेही गरीब कुटुंब उपाशी राहू नये यासाठीपीएमजीकेएवाय या योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

या सहा महिन्यातप्रत्येक लाभार्थ्याला त्याच्यासाठीच्या रेशनच्या धान्याव्यतिरिक्त आणखी पाच किलो धान्य/प्रती व्यक्ती/प्रती महिना दिले जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक कुटुंबालात्यांच्या नेहमीच्या धान्याच्या दुप्पट धान्य मिळणार आहे.

पीएम-जीकेएवाय  अंतर्गतकेंद्र सरकारने आतापर्यंतम्हणजेच पाचव्या टप्प्यापर्यंत, 759 लाख मेट्रिक टन अन्न वितरित केले आहे. त्याशिवायसहाव्या टप्पात 244 लाख मेट्रिक टन मोफत अन्नधान्याचे वितरण केले जाणार आहे. यामुळेया योजनेअंतर्गत एकूण, 1003 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप होईल.

तसेचस्थलांतरित कामगारांना या योजनेचा लाभ घेतांनाएक देशएक शिधापत्रिका योजनेनुसार देशात कुठेही अन्नधान्य घेता येईल. देशभरातल्या पाच लाख स्वस्त धान्य दुकानांमधून या योजनेचे धान्य त्यांना घेता येईल. आतापर्यंत घरापासून दूर असलेल्या 61 कोटींपेक्षा अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

देशात महामारीचा प्रकोप सुरु असतांनाहीसरकारने शेतकऱ्यांकडून विक्रमी हमीदराने मोठी धान्यखरेदी केल्यामुळेच ही योजना यशस्वीपणे राबवणे शक्य झाले. तसेच शेतकऱ्यांनी देखील या काळात विक्रमी धान्य उत्पादन केल्यामुळेया योजनेच्या यशाचे श्रेय त्यांनाही द्यायला हवे.