PM kisan योजनेची गावात KYC, तात्काळ होणार दुरुस्त्या | PM KISAN yojana update

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या प्रलंबित कामांचा होणार निपटारा, शासन परिपत्रक निर्गमित

 PM KISAN yojana update 



प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या प्रलंबित कामांचा निपटारा, दुरुस्त्या, भौतिक तपासण्या हि काम तात्काळ पार पाडण्यासाठी एक शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. 



प्रधानमंत्री सन्मान निधी (पीएम किसान)  योजनेच्या प्रलंबित डाटा दुरुस्तीसाठी कॅम्प आयोजित करणे, योजनेतील लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे व अपात्र ठरलेलया लाभार्थ्यांकडुन दिलेला लाभ वसूल करणेबाबत च्या सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत. 

परिपत्रक येथे पहा 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रलंबित डाटा दुरुस्तीसाठी कॅम्पचे आयोजन करणे, योजनेतील लाभार्थ्यांची भौतीक तपासणी करणे व अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून दिलेला लाभ वसूल करणेबाबत.



 या परिपत्रक नुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत प्रलंबित अर्जांच्या डाटा दुरुस्तीचे काम करण्यासाठी, संबंधित शेतक-यांना NIC मार्फत दुरध्वनीद्वारे संदेश पाठवून त्यांचा अर्ज कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे याबाबत कळविण्यात येईल . 

तसेच सदर डाटा दुरुस्तीचे काम पूर्ण करुन पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यासाठी मार्च महिन्यातील चौथ्या शुक्रवारी गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीत कॅम्पचे आयोजन सर्व पात्र लाभार्थ्यांचा डाटा दुरुस्त होईपर्यंत करण्यात यावे अशा सूचना यात देण्यात आल्या आहेत. 



कॅम्पच्या वेळी अर्जदारांना सोबत सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्र घेऊन येण्याबाबत कळविण्यात यावे. डाटा दुरुस्तीचे कृषी व ग्रामविकास विभागाच्या समन्वयाने पार पाडावे. तसेच याकरीता प्रचार प्रसिध्दी करुन कॅम्पचे आयोजन यशस्वी होण्याच्या अनुषंगाने संबंधित तहसिलदार यांनी आवश्यक कार्यवाही करावी. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी प्राप्त होणा-या रकमेतून मानधन देऊन योजनेतील लाभार्थ्यांची भौतिक तपासणी गाव पातळीवर कृषी मित्राच्या मार्फत करण्यात यावी. 
कृषी मित्रामार्फत लाभार्थ्यांची तपासणी केल्यानंतर याबाबतची पडताळणी क्रॉस चेकींग तलाठी, कृषी सेवक व ग्रामसेवक यांच्यामार्फत करण्यात यावी, आणि भौतिक तपासणी फॉर्म तलसिल कार्यालयात जमा करुन 100 टक्के पूर्ण करण्यात यावी. 


  आयकर व इतर कारणामुळे अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून दिलेला लाभ वसुलीचे काम जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली महसूल विभागाने पार पाडावे. प्रस्तुत योजने अंतर्गत वसूल झालेला निधी तात्काळ केंद्र शासनास जमा करण्याची कार्यवाही करावी. 
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थींचे सामाजिक अंकेक्षण केंद्र सरकारच्या सुचनेप्रमाणे गावपातळीवर लाभार्थी याद्या प्रदर्शित करुन आणि गावपातळीवरील प्रमाणपत्र घेऊन महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि कृषी विभागाच्या समन्वयाने पूर्ण करावे अशे निर्देश या परिपत्रकातून देण्यात आले आहेत.