शेळी गट, दुधाळ जनावर गट, कुक्कुट पक्षी वाटप योजना अर्ज सुरू || Sheli Mendhi Gat Vatap Yojana

 वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अर्ज मागणी (विघयो,आदिवासी उपाययोजना, सर्वसाधारण  )- पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद 


शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी शासन नेहमीच मदत करीत आहे. वंचितांना अधिक न्याय मिळावा यासाठी दुधाळ जनावरे व शेळी वाटप, कुक्कुट पक्षी वाटप ही योजना राबविली जाते


अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी दुधाळ जनावरे गट वाटप योजना, शेळी गट वाटप योजना आणि शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्यां अशा विविध योजना राबविल्या जात आहेत. 



दुधाळ जनावरे गट वाटप योजना ही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी राबविली जाते. या योजनेंतर्गत 75 टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरे गट वाटप केले जाते. दोन जनावरांमुळे कुटुंबाला नियमित उत्पन्नाची सोय होते हे विशेष.

या योजनेच्या निकष आणि अटीमध्ये लाभार्थी निवड जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने) दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टरपर्यंतचे भूधारक ), अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टरपर्यंतचे भूधारक ) आणि सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले तसेच महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. 1 ते 4 मधील ) अशी केली जाते.



या योजनेचे अर्ज नजिकच्या पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात उपलब्ध असून परिपूर्ण अर्ज पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती येथे सादर करावेत.

या योजना करिता उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत 

अर्जाचा नमुना खालील लिंक वर मिळेल 

Sheli Mendhi Gat Vatap Yojana Form

Arjacha namuna PDf


जाहिरात येथे पहा