हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा २५% अग्रीम विमा रकमेचा मार्ग मोकळा ! kharip pik vima 2021

हिंगोली  जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा २५% अग्रीम विमा रकमेचा मार्ग मोकळा ! 
Soyabin , udid hingoli Kharip pik vima 2021

विमा संरक्षित रकमेची नुकसानभरपाई शासनाच्या कृषी महसूल व ग्रामविकास विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शेतकऱ्यांना दिली जाते. याचबरोबर स्थानिक आपत्ती व प्रतिकूल परिस्थितीमुळे उदाहरणार्थ पूर, पावसातील खंड, दुष्काळ यामुळे अपेक्षित उत्पादनात सरासरी उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसानभरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्केच्या मर्यादेत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.
याच तरतुदी च्या आधारे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाच्या पडलेल्या खंडा मूळे उत्पन्नात होणारी घट लक्षात घेऊन उडीद आणि सोयाबीन या पिकाच्या उत्पन्नात 50% पेक्षा जास्त घट अपेक्षित असलेल्या पात्र मंडळांना पीक विमा पात्र ठरविणारी  अधिसूचना  जिल्हाधिकारी जितेंद्र फाफळकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काढली आहे.
 सोयाबीन पिकासाठी
औढा नागनाथ तालुका 
औ नागनाथ, जवळा, येहळेगाव, साळणा मंडळ वसमत तालुका 
वसमत, आंबा, हयातनगर, गिरगाव, हट्टा, टेम्भुर्णी, कुरुंदा मंडळ

सेनगाव तालुका
साखरा, पानरकान्हेगाव , हत्ता मंडळ 

कळमनुरी तालुका 
कळमनुरी,  डोंगरकडा  मंडळ 
  कळमनुरी , वाकोडी , नांदापुर, आ बाळापूर, वारंगा, 
सेनगाव  गोरेगाव, आजगाव

हिंगोली तालुका 
हिंगोली, नरसी ना, सिरसम, वासांबा, दिंग्रस क , माळहिवरा, खांबाळा मंडळ 

तर उडीद या पिकासाठी 

औढा नागनाथ तालुका
 औ नागनाथ, जवळा, येहळेगाव, साळणा मंडळ 

वसमत तालुका 
वसमत, आंबा, हयातनगर, गिरगाव, हट्टा, टेम्भुर्णी, कुरुंदा मंडळ 

सेनगाव तालुका 
साखरा, पानरकान्हेगाव , हत्ता मंडळ 

कळमनुरी डोंगरकडा 
कळमनुरी  कळमनुरी , वाकोडी , नांदापुर, आ बाळापूर, वारंगा, 
सेनगाव  सेनगाव  गोरेगाव, आजगाव

हिंगोली

 हिंगोली, नरसी ना, सिरसम, वासांबा, दिंग्रस क , माळहिवरा, खांबाळा मंडळ 
अशी मंडळ या ठिकाणी पात्र ठरविण्यात आले आहेत.