महाराष्ट्रात आजपासून नवा सातबारा उपलब्ध || digital satbara maharashtra

महाराष्ट्रात आजपासून नवा सातबारा, आता जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही.


आज महसूल दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसुली सेवांबाबत मोठी घोषणा केलीय. 
आजपासून महाराष्ट्रातील नागरिकांना नव्या फॉरमॅटमध्ये ऑनलाईन सात बारा नव्या रुपात मिळणार आहे.
 महसूल विभाग ही नवी सेवा सुरू करत आहे. यामुळे सहजता, पारदर्शकता आणि बिनचूक सेवा सुरू होईल. सर्व सेवा ऑनलाईन असेल, यामुळे आता तलाठ्यांचा वेळ वाचले आणि कुणालाही जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही, असे ही यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.

 याच बरोबर मिळकत पत्रिका सुद्धा पूर्ण होत आलीय. ई म्युटेशन सुद्धा पूर्ण होत आलेय, आणी नागरिकांना याचा लाभ लवकरच मिळेल. 
याच प्रमाणे अनेक ठिकाणी जमिनी असतील तरी एकच सातबारा मिळल व 2008 पासूनचे फेरफार सुद्धा डिजीटल रुपात मिळनार आहेत अशी ही माहिती त्यांनी यावेळी सांगितले.

हा सात बारा काढण्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा रुपये चार्ज लागेल. या सेवे साठी बँके सोबत शासन करार करणार आहे, यामुळे बँका पण सात बारा काढू शकतील. 
आता सातबारा वर खोट्या नोंदी करता येणार नाही. सातबारा वर फोटो आणि लोकेशन मिळेल. गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. 
 असंही थोरातांनी नमूद केलं.