2020 च्या अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी राज्य सरकारने 3721 कोटींची मागणी केंद्राकडे केली होती.
आणि याच अनुषंगाने आज लोकसभेमध्ये केंद्रीय कृषीमंत्र्यांनी या अनुषंगाने पिकांच्या नुकसानीसाठी 701 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा मिळेल, असा विश्वास आहे.
तसेच 2020-21 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेती वीमा अंतर्गत क्लेम केलेल्या 11 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना 750 कोटींचा निधी वाटप करण्यात आला.
याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोकणा सह इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
यासंदर्भात राज्य सरकारतर्फे केंद्राला आर्थिक मदतीची विनंती करणार असून केंद्र सरकार याची योग्य ती दखल घेवून तातडीने मदत करेल अशी अपेक्षा राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली आहे.
ativrushti nuksan bharpai